सोयाबीन काढतांना थ्रेशरमध्ये अडकून मजुराचा मृत्यू: डोंगरशेवली येथील घटना

0
521

चिखली: तालुक्यातील डोंगरशेवली येथे सोयाबीन काढतांना थ्रेशरमध्ये अडकवून मजूराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. गणेश राजाराम खेडवणकर वय ३५ रा. डोंगरशेवली असे मजूराचे नाव आहे. तो कृष्णा गायकवाड यांच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम करीत होता.

सोयाबीनचे काड लोटण्याचे काम करीत असताना त्याचा तोल जावून तो थ्रेशरच्या पट्ट्यावर पडला. थ्रेशर सुरु असल्याने त्याचे शरीर आत कंबरेपर्यंत ओढल्या गेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सध्या शेतात सर्वत्र  पीके काढण्याचे काम सुरु आहे, अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisements
Previous articleबुलडाणा जिल्ह्यात आज 43 पॉझिटिव्ह
Next articleलोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here