मतदार यादीत पात्र मतदारांनी नाव नोंदवावे

0
67

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी प्रारूप मतदार केंद्र यादी प्रसिद्ध
बुलडाणा: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीकरीता जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांत एक याप्रमाणे एकूण 13 व बुलडाणा तालुक्यात एक सहाय्यकारी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. असे एकूण 14 प्रारूप मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सततच्या पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत पात्र मतदारांच्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र  मतदारांनी याची नोंद घेवून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ एस राममूर्ती यांनी केले आहे.
शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या पाहणीकरीता प्रारूप मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा निवडणूक विभाग येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तसेच सदर यादीचे अवलोकन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here