आंतर जिल्हा व शिवशाही नवीन बस वाहतुक आजपासून सुरू

0
142

बुलडाणा (जिमाका) : विभागातंर्गत आंतर जिल्हा व शिवशाही नविन बस वाहतुक दि. 8 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांना प्रति बस पुर्ण आसन क्षमतेने प्रचलीत दराने प्रवास करता येणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशास मास्क घालणे बंधनकारक राहील. चालविण्यात येणाऱ्या बसेस ह्या पुर्णत: निर्जंतुकीकरण करून चालविण्यात येतील. तसेच प्रवाशी गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून या नविन बस वाहतुकीचे वेळापत्रक  जाहीर करण्यात आले आहे. ह्या बसेसला संगणकीय आरक्षण उपलब्ध आहे. त्यासाठी प्रवाशांनी www.msrtc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा व या नवीन बसवाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. रायलवार यांनी केले आहे.
असे आहे वेळापत्रक
बुलडाणा आगार : यवतमाळ दुपारी 3.30 वाजता, लातूर सकाळी 8.30 वा, अमरावती दु. 12 व 4 वा, परतवाडा दु 1 वाजता, चिखली आगार : जळगांव खांदेश सकाळी 11.45 वा, मुंबई दु. 4.45 वा, पुणे सायं 6.30 वाजता शिवशाही, खामगांव आगार : नांदुरीगड (सप्तश्रृंगीगड) सकाळी 8.30 वा, मेहकर आगार : त्र्यंबकेश्वर स 7 वा, जळगांव जामोद आगार : पुणे स 8 वा, अमरावती स 11 वाजता, शेगांव आगार : पंढरपूर स 7.30 वा, औरंगाबाद स 6.15 वा, शिर्डी स 9.15 वा शिवशाही, पुणे सकाळी 7 वाजता शिवशाही.

Advertisements
Previous articleपुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’
Next articleआरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आराखडा तयार करा- डॉ. राजेंद्र शिंगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here