अमरावती विद्यापीठ : परीक्षेसंदर्भात कुलगुरू साधणार आज संवाद

0
523

प्रा. मयुरी पाटील |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० च्या परीक्षा ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
ऑनलाईन परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची व्यवस्था परीक्षा केंद्रावर करण्यात येणार आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती तसेच सूचना देण्यासाठी कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, प्र – कुलगुरू डॉ.राजेश जयपुरकर तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख हे आज ९ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ४ वाजता YouTube Live द्वारे आपल्याशी संवाद साधणार आहेत.YouTube लाईव्ह साठी नियोजित वेळेवर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे ..

कुलसचिव
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
————————————————————
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व्हिडीओ पहावा व परीक्षा द्यावी, अशी सूचना विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती व व्हिडिओ पोहोचावा, ही नम्र विनंती.
डॉ. विलास नांदुरकर
जनसंपर्क अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here