हवामान विभागाचा सर्तकतेचा इशारा

0
227

अकोला: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार  (दि.16  ऑक्टोंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये  हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व इतर लघु प्रकल्पामध्ये जवळपास 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवून प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णया घेण्यात येईल. तरी याबाबत नदीपात्रा शेजारील गावातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच  नागरिकांनी नदी नाल्यांना पूर असताना पुर ओलाडण्याचा प्रयत्न करु नये करिता त्याअनुषंगाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

Advertisements
Previous articleबुलडाणा: जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू ; सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत वेळ
Next articleकोविडसंदर्भात राज्यात २ लाख ८० हजार गुन्हे दाखल; ४० हजार व्यक्तींना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here