‘तंबाखु मुक्त शाळा’ मोहिम राबवा! जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

0
180

अकोला :तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होण्याऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करुन कोटपा कायद्यानुसार ‘तंबाखु मुक्त शाळा’ मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधीत यंत्रणांना दिले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, शिक्षणाधिकारी माध्यमीक प्रकाश मुकुंद, अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. फरीदा अहसान, पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ, जिल्हा समुपदेशक धम्मसेन सिरसाट, जिल्हा समन्वय समितीचे सदस्य प्रा. मोहन खडसे, प्रा. संकेत काळे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थ्यांची विक्री करणारी दुकाने शाळेपासून 100 यार्ड परिसरात लावण्यास प्रतिबंध करावे. तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था यांच्या 100 यार्डच्या परिसरात येलो लाईन आखून ‘तंबाखू मुक्त शाळा’ मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्यात. शाळा व महाविद्यालयात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ्यामुळे होण्याऱ्या दुष्परीणामाचे फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी. तसेच जिल्ह्यामध्ये अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या तंबाखुजन्य पदार्थावर कार्यवाही करण्याकरीता विशेष पथक तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here